शाळेचा पहिला दिवस 2026-2027
म. ए सो. बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रोड, पुणे शाळेतील विद्यार्थ्यांनी सीमेवरिल सैनिका साठी शुभेच्छा पत्र व राख्या तयार केल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मोनिकाताई खेडलेकर बाईंनी विद्यार्थ्यांना देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि सीमेवरील जवानांचे महत्त्व व रक्षाबंधनाचे महत्व सोप्या शब्दात सांगितले.
इयत्ता 4 थी च्या विद्यार्थ्यांनी देखील आपल्या सैनिकांप्रती असणारे प्रेम,जवानांप्रती असणारा आदर, कृतज्ञता पत्रातून व्यक्त केल्या. आणि आपल्या आवडत्या सैनिकांसाठी छान राख्या मनापासून तयार केल्या. याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका व
मातृ शक्ती संघटनेच्या सौ. चारूलता काळे व सौ. अस्मिता अग्निहोत्री यांनी देखील विद्यार्थ्यांनी कमी वेळेत 400 राख्या केल्याबद्दल विदयार्थ्यां चे कौतुक केले.
जय हिंद! जय भारत!
म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर डेक्कन जिमखाना पुणे - ४
गुरूपौर्णिमा
बुधवार दिनांक २९ जुलै रोजी शाळेत गुरुपौर्णिमे निमित्त बाल शिक्षण मंदिर डेक्कन या शिक्षण पंढरीमध्ये आजी-माजी शिक्षक विद्यार्थी या मांदियाळींच्या उपस्थितीमध्ये कृतज्ञता निधी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी सर्व उपस्थितांनी गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा हे गीत गायन केले.
आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांच्यातर्फे शाळेला एक लाखाचा धनादेश देणगी स्वरूपात देण्यात आला.
माजी विद्यार्थी श्री आदित्य जयंत कुलकर्णी यांच्यातर्फे रुपये दहा हजारांचा धनादेश देण्यात आला.
तसेच शाळेच्या माजी विद्यार्थिनी श्रीमती संगीता पुराणिक ताई(सन1958_60) यांनी इयत्ता तिसरीच्या सर्व विद्यार्थ्यांना चित्रकला साहित्य भेट म्हणून दिले. तसेच माजी विद्यार्थी श्री सुधीर कऱ्हाडकर यांनी शाळेस(8फुट) ॲल्युमिनियमची शिडी भेट दिली.
या कार्यक्रमासाठी शाला समिती अध्यक्षा मा. मैत्रेयी देसाई, महामात्रा डॉ. अश्विनी पाटील, माजी शिक्षिका श्रीमती मेधा शिंत्रे मुख्याध्यापिका सौ.खेडलेकर मोनिका तसेच सौ. उमा हिरेमठ माजी विद्यार्थी श्रीमती संगीता पुराणिक, श्री. नितीन महाबळेश्वरकर, श्री. गणेश साने, श्री.सुधीर कऱ्हाडकर तसेच शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
त्यानंतर बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी गुरु शिष्यांची गोष्ट सांगून गुरूंचे महत्त्व सांगितले. गुरूंच्या प्रती आदर, नम्रता, आज्ञाधारक, गुरूनिष्ठा ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी ही बालसभा खूप महत्त्वाची ठरली. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी बालसभेत संतांच्या गोष्टी सांगून संत परंपरेचे महत्त्व जाणून घेतले.
अशाप्रकारे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
*पाऊले चालती पंढरीची वाट
म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर डे. जि. पुणे येथे अवतरले वारकरी.
शनिवार दि. १८/७/२०२६ रोजी आषाढी एकादशीनिमित्त शाळेत पालखी सोहळ्याचे वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले.
या पालखी सोहळ्यात शाळेतील विद्यार्थी वारकऱ्यांच्या पोशाखात तर काही विद्यार्थी संतांच्या वेशभूषेत या दिंडीत सहभागी झाले. शाळेतील मा. मुख्याध्यापिका सौ. मोनिका खेडलेकर यांनी पालखीचे पूजन केले. नंतर या शाळेभोवती या पालखी सवे विद्यार्थ्यांनी फेरी मारली.
यावेळी शाळेचे माजी पालक सौ अर्चना मायदेव यांनी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पसायदानाचा अर्थ सोप्या भाषेत समजावून दिला.*
भेटी लागी जीवा लागतसे आस या ओळी शाळेतील माजी विद्यार्थ्यांसाठी अगदी साजेशा आहेत. त्यांना देखील शाळा रुपी पंढरपूर येथे आजच्या दिवशी आवर्जून यावेसे वाटले.
पालखीचे औचित्य साधून शाळेचे माजी विद्यार्थी व प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ जगदीश चंद्र हिरेमठ यांनी उभयता शाळेस विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती भेट दिली. यावेळी म. ए. सो. चे आजीव सदस्य श्री. दिलीप शेठ उपस्थित होते. यावेळी रेवडी व शिरा प्रसाद म्हणून वाटण्यात आला.खूप आनंदात व उत्साहात शाळेत पालखी सोहळा साजरा करण्यात आला.
पालखी सोहळा म्हणजे ज्ञान भक्ती आणि एकाग्रतेचे प्रतिक होय. सर्वांनी प्रेमाने राहावे,चांगले विचार करावेत,आणि समाजसेवा करावी हा पालखी सोहळ्यामागचा उद्देश असतो.
या पालखी सोहळ्याचे औचित्य साधून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने एक विचार मांडला. प्रत्येक शाळेतील माजी विद्यार्थ्यांकडून वृक्ष लावून घेणे व त्याचे संवर्धन करणे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर डेक्कन जिमखाना, पुणे 4 या शाळेत गुरुवार दिनांक 9/7/2026 रोजी वृक्षारोपण करण्यात आले . यासाठी म.ए.सो.चे मा.अध्यक्ष व शाळेचे माजी विद्यार्थी निवृत्त एरमार्शल श्री.भूषणजी गोखले यांच्या हस्ते शाळेच्या मैदानावर रोप लावण्यात आले.
यावेळी म.ए.सो.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर, क्रीडा वर्धिनीचे मा.अध्यक्ष श्री विजय भालेराव, शाळेच्या शाला समितीच्या मा.अध्यक्षा मैत्रेयी देसाई, शाला समितीच्या मा.महामात्रा डॉ.अश्विनी पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका मोनिका खेडलेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शाळेतील विद्यार्थी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांना झाडाचे संवर्धन करण्याविषयीचा संदेश मा. भूषणजी गोखले सरांनी मुलांना दिला.
🧘योगदिन अहवाल🧘
. 📌सोमवार दि. २२/०६/ २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन शाळेत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
. 📌या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेची माजी विदयार्थीनी कराटे चॅम्पियन कु. दिया मारणे या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. शितोळे सर यांनी करून दिला.
. 📌श्री. कंक सर यांनी योगदिनाबद्दल माहिती सांगितली. योगामुळे शरीराला होणारे फायदे, वाढणारी एकाग्रता याबद्दल माहिती सांगितली. योगामुळे शरीर, मन निरोगी राहते. व आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढते हे सांगितले. प्रमुख-पाहुण्यांनी योगासने का करावीत हे स्पष्ट केले. तसेच. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. मोनिका खेडलेकर बाई यांनी योगदिनाचे महत्व,
संतुलित आहार कसा असावा व योगातून आनंद कसा साधता येतो. हे सागितले. श्री. शितोळे सर व दिया मारणे यांनी काही योगासने व प्राणायम यांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली.
. 📌श्री. शितोळे यांनी पाहुण्यांचे आभार मानले व अशा रितीने शाळेत जागतिक योगदिन उत्साहाने साजरा करण्यात आला.




































