मनसेचा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार.(२०२४-२५)
सर्वांना नमस्कार, कळविण्यात आनंद होत आहे की सौ. सुनिता चव्हाण. (मुख्याध्यापिका म.ए. सो. बालशिक्षण मंदिर पुणे -४) यांना मनसे प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना यांच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील कार्य, विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार, व नेतृत्व कौशल्य यासाठी मिळाला आहे. संपूर्ण राज्यातून 103 प्रस्ताव प्राप्त झाले होते. माजी शिक्षण उपसंचालक, सोलापूर विद्यापीठाचे उपकुलसचिव, मोहोळचे शिक्षण विस्तार अधिकारी, सोलापूर साहित्य परिषदेचे अध्यक्ष, तसेच नवनिर्माण शिक्षक संघटनेचे राज्य व जिल्हा पदाधिकारी यांच्या छाननी समितीने निवड केली व हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
MES चे माननीय पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व शुभेच्छा तसेच आपली शाळा यांचे हे श्रेय असल्याची भावना सौ. सुनिता चव्हाण यांनी व्यक्त केली आहे !