आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, लक्ष्मण नरहर इंदापूरकर आणि वामन प्रभाकर भावे अशा प्रतिभावंत व द्रष्टया समाजधुरकांनी सन 1860 साली पुणे येथे म.ए.सोची स्थापना केलेली व नुकतीच वैभवशाली 160 वर्ष पूर्ण केलेली पुणे येथील ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, सासवड, नगर, शिरवळ, सोलापुर व चिपळूणमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची मुळे रूजली आहेत. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन विविध प्रकारचे तंत्र शिक्षण आणि या सर्वांहून वेगळे असे मुलीनां सैनिकी शिक्षण या क्षेत्रात आपला वैशिष्टय पूर्ण ठसा उमटवलेली व दिवसेंदिवस नानाविध क्षेत्रे पादाक्रांत करणारी ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ ही वर्तमान काळातील शैक्षणिक क्षेत्रातील एक मानदंड ठरलेली आहे.
आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे, राणी लक्ष्मीबार्इ मुलींची सैनिकी शाळा कासार अंबोली पुणे, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस पुणे, शिक्षण प्रबोधिनी पुणे. या देशभर नावाजलेल्या प्रमुख शाखा आहेत. या शिवाय वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी वाटचालीचे एक रूप म्हणजे चिपळूण येथील इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स.
अधिक माहितीसाठी https://mespune.in/