




स्वागत आहे
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची
बाल शिक्षण मंदिर
डेक्कन जिमखाना, भंडारकर रोड, पुणे - 411004





म.ए.सो बाल शिक्षण मंदिर, डे.जि. पुणे
उज्ज्वल परंपरा लाभलेल्या संस्थेची उज्ज्वल भवितव्य असणारी प्राथमिक शाळा म्हणजेच डेक्कन जिमखान्यावरील म.ए.सो बाल शिक्षण मंदिर! पारतंञ्याच्या काळात विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम निर्माण व्हावे म्हणून २२ ऑक्टोंबर १९२२ दिवाळीचा पाडवा या दिवशी शाळेची डेक्कन जिमखान्यावरील भाजेकर पॅव्हेलियन मध्ये स्थापना झाली. बघताबघता विद्यार्थी संख्या वाढू लागली. डेक्कन जिमखाना हौसिंग सोसायटीने भांडारकर रोडवरील सध्याच्या इमारतीचे बांधकाम केले व नोव्हेंबर १९३८ पासून शाळा भांडारकर रोडवरील सध्याच्या इमारतीत आली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (म.ए.सो) बद्दल
आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, लक्ष्मण नरहर इंदापूरकर आणि वामन प्रभाकर भावे अशा प्रतिभावंत व द्रष्टया समाजधुरकांनी सन 1860 साली पुणे येथे म.ए.सोची स्थापना केलेली व नुकतीच वैभवशाली 160 वर्ष पूर्ण केलेली पुणे येथील ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, सासवड, नगर, शिरवळ, सोलापुर व चिपळूणमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची मुळे रूजली आहेत. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन विविध प्रकारचे तंत्र शिक्षण आणि या सर्वांहून वेगळे असे मुलीनां सैनिकी शिक्षण या क्षेत्रात आपला वैशिष्टय पूर्ण ठसा उमटवलेली व दिवसेंदिवस नानाविध क्षेत्रे पादाक्रांत करणारी ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ ही वर्तमान काळातील शैक्षणिक क्षेत्रातील एक मानदंड ठरलेली आहे.

शाळेबद्दलउज्ज्वल परंपरा लाभलेल्या संस्थेची उज्ज्वल भवितव्य असणारी प्राथमिक शाळा म्हणजेच डेक्कन जिमखान्यावरील म.ए.सो बाल शिक्षण मंदिर!
प्राचार्यांचा संदेशनमस्ते आणि वेलकम टू एमईएस बाल शिक्षण मंदिर, डे.जि. पुणे. आपण योग्य निर्णय घेतला असताना..
पायाभूत सुविधासुविधांसह शाळा इमारत, एक मोठे खेळाचे मैदान, मोठे ग्रंथालय, संगणक लॅब,..
कार्यक्रम आणि उपक्रमराष्ट्रीय सण समारंभ, भोंडला, स्नेहसंमेलन, बालपणीच्या कविता, निधी संकलन, आरोग्य तपासणी, कॄतज्ञता निधी हुंडी, शैक्षणिक सहल..
प्राध्यापक आणि कर्मचारीप्राथमिक-प्राथमिक इंग्रजी विद्याशाखा आणि कर्मचारी, प्राथमिक इंग्रजी विद्याशाखा आणि कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी
प्रवेशपूर्व-प्राथमिक विभाग प्रवेश (प्ले गट, लोअर केजी, अप्पर केजी) आणि प्राथमिक विभाग प्रवेश
